आयपीएल 2025 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का , धुरंदर खेळाडूला दुखापत
आयपीएल 2025 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का , धुरंदर खेळाडूला दुखापत
img
Dipali Ghadwaje
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला सुरूवात झाली आहे. मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काही अंशी त्यांना यश देखील मिळाले. 

सामन्यादरम्यान कर्ण शर्मा क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला आहे. दीपक चहर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने अभिषेक शर्माला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. 

ओव्हरच्या सुरुवातीला ३ डॉट बॉल टाकले. नंतर अभिषेकने एक चौकार मारला. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अभिषेक शर्माने मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला. तेथे कर्ण शर्मा उभा होता. कर्ण शर्माने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात त्याच्या बोटांना जखमा झाल्या. दुखापतग्रस्त झाल्याने कर्ण शर्माला मैदानाबाहेर नेण्यात आले. कर्ण शर्मा दिल्ली विरुद्धच्या मुंबईसाठी लकी ठरला होता. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळताना त्याने ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे या खेळामुळे कर्णला आज प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाली.

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराजयर्स हैदराबाद हा आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना सुरु झाला आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनराजयर्स हैदराबादच्या फलंदाजांना जास्त धावा न करु देण्याचे आव्हान मुंबईच्या गोलंदाजांसमोर आहे.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ - रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ - अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.
इतर बातम्या
Join Whatsapp Group