मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आज थेट हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात धडकले. मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन मनसेने आक्रमक भूमिका घेतली.
हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकर यांनी जाब विचारला. हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? हा जाब त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना विचारला. अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक हे नेते हॉटस्टारच्या कार्यालयात पोहोचलेत. पोलीस देखील कार्यालयात उपस्थित आहेत.
हॉटस्टारचा सबंधित अधिकारी संजोग गुप्ता कुठे आहे मनसे नेत्यांचा सवाल. मनसे नेते अमेय खोपकरानी मंत्री उदय सामंत यांना फोन लावला. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अमलबजावणी होईल असे लेखी पत्र घ्या, उदय सामंत यांचा मनसेच्या मागणीला पाठिंबा.
संजोग गुप्ता कुठे आहे त्याला तुम्ही बोलवा किंवा आम्ही जाऊन आणू असं मनसे नेते म्हणाले. “मराठी भाषेची कॉमेंट्री का असू नये? हे कोण ठरवणारे, बाकीच्या भाषांची असावी आणि मराठीची नसावी, बाकीच्या भाषांचा आदर आहेच. पण मराठीत कॉमेंट्री असावी हे शंभर टक्के बरोबर आहे” असं उदय सामंत यांनी सांगितलं.
त्यावर ‘साहेब मी इथून पत्र घेऊन निघतो. काही असेल तर फोन करतो’ असं अमेय खोपकर म्हणाले. ‘सांगा, आता काय करायचं?’ “तुम्हाला, आता मंत्री महोदयांनी सांगितलं, सांगा आता काय करायचं? तुम्हाला काय मदत लागेल ते सांगा, मी सर्व मदत करायला तयार आहे” असं अमेय खोपकर म्हणाले.
त्यावर समोरच्या अधिकाऱ्याने “मी प्रोडक्शनमध्ये नाही, पण स्टुडिओ सेटअप करायला काही दिवस लागतील” असं म्हणाला. त्यावर अमेय खोपकर म्हणाले की, “दोन दिवसाचं काम नाही, काय मोठा सेटअप लागतो. स्टेडिअममध्ये माणसं कॉमेंट्रीसाठी बसत नाहीत. स्टुडिओमध्ये बसतात. दोन दिवस पण लागत नाहीत. मला लेखी द्या, मी निघालो” असं अमेय खोपकर म्हणाले.