राज ठाकरेंना धक्का ! शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र
राज ठाकरेंना धक्का ! शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र
img
वैष्णवी सांगळे
ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राज ठाकरेंच्या मनसेलाही कल्याणमध्ये जोरदार धक्का बसलाय. राजू पाटील यांचे विश्वासू कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसे  मोठा धक्का मानला जातोय.

मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी मनसेचा आज राजीनामा दिला. माजी आमदार राजू पाटील यांचे समर्थक मनसे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, मनसेच्या माजी नगेसेविका कस्तुरी देसाई यांनी आज पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. 

दोन दिवसांत ते पुढील रणनिती ठरणार असल्याचे समजतेय. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी देसाई दाम्पत्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. पण आता त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा विचार केला आहे. पुढील दोन दिवसांत ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

कौस्तुभ देसाई यांचं कल्याणमध्ये मोठं प्रस्थ आहे. त्यांचा मतदारांसोबत थेट संपर्क असल्याने मनसेच्या वाढीसाठी फायदा होत होता. विधानसभेत राजू पाटील यांच्या प्रचारात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. राजू पाटील यांचे विश्वासू म्हणून देसाई यांची ओळख होती. पण त्यांनी मनसेला आता जय महाराष्ट्र केला आहे. देसाई यांनी रामराम ठोकल्याचा फटका मनसेला बसणार आहे. 
MNS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group