मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा
img
दैनिक भ्रमर

नाशिक  (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.

दातीर हे गेल्या अनेक वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत होते. त्यांनी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ही पदे भूषवली आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक आंदोलने करून महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती, मात्र त्यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

आपण आपला राजीनामा पक्षाचे सचिव यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group