विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला .मात्र महाविकास आघाडीच्या हाती निराशा आली कारण हा निकाल आघाडी साठी धक्कादायक ठरला. महाविकास आघाडीला धक्का बसलाच मात्र त्याहून कितीतरी अधिक पटीनं मनसेला धक्का बसला. कारण मनसेला राज्यात खातं देखील उघडता आलं नाही. गेल्यावेळी मनसेचा एक आमदार निवडून आला होता, मात्र यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांचा देखील पराभव झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आलेल्या अपयशाची जबाबदारी स्विकारून, मनसेचे ठाणे -पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्ट करत अविनाश जाधव यांनी राजीनाम्याबाबत माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे.’ अशी पोस्ट अविनाश जाधव यांनी फेसबुकवर केली आहे.