जय मालोकार मृत्यू प्रकरण;  पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक  खुलासा, प्रकरणाला नवीन वळण
जय मालोकार मृत्यू प्रकरण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, प्रकरणाला नवीन वळण
img
दैनिक भ्रमर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केल्यानंतर मनसे आक्रमक झाली. त्यांनी अकोल्यात आमदार मिटकरींची मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात गाडी फोडली. ही घटना 30 जुलैची आहे . त्यांनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये मनसे सैनिक जय मालोकार यांचाही समावेश होता. जय मालोकार यांचा गाडी फोडल्याच्या घटनेच्या दिवशी मृत्यू झाला होता. आता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.

 जय मालोकारचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर जबर मारहाणीनं झाल्याचं समोर आलंय. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार,मालोकार यांच्या अंगावर महत्त्वाच्या अवयवांना अनेक दुखापत झाल्या होत्या. या जखमांमुळे जय मालोकार याचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अहवालात वर्तवण्यात आलीय.जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, आणि जयजय मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींकडून आमच्या जीवितीला धोका असू शकतो, त्यामुळं पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी मालोकार कुटुंबीयांनी केलीय. वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद आहे, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झालेला नाही. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, स्थानिक पोलीस सहकार्य करत नाहीये, त्यामुळे सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मृत जय मालोकार याचा मोठा भाऊ विजय मालोकार यांनी केलीये.

इतर बातम्या
Join Whatsapp Group