मराठी भाषेवरील मुद्दा चिघळण्याची शक्यता  ? मनसेच्या ''या'' नेत्याला अज्ञाताकडून धमकी
मराठी भाषेवरील मुद्दा चिघळण्याची शक्यता ? मनसेच्या ''या'' नेत्याला अज्ञाताकडून धमकी
img
दैनिक भ्रमर

 मराठी भाषेवरील मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना एका अज्ञाताने फोन करून धमकी दिली. मनसेने मराठीच्या मुद्यावर आंदोलन सुरू केल्यानंतर मराठी भाषेबद्दल अपमानास्पद भाष्य करणाऱ्या काही उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मनसेने आपले आंदोलन मागे घेतले असताना आता पुन्हा मराठी-अमराठी वाद चिघळण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना एका अज्ञाताने फोन करून धमकी दिली. या प्रकरणी ऑडिओ क्लीप समोर आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आलेल्या धमकी संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने संदीप देशपांडे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. संदीप देशपांडे यांनी म्हटले की, काल रात्री सव्वा दहा वाजता कॉल आला. या अज्ञात व्यक्तीकडून नुसत्याच शिव्या घालत होता. पुन्हा कॉल आला तेव्हा पण तुम्हाला घरी येऊन मारू. अशा धमक्यांना मी घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी म्हटले. कोण मुंबई-महाराष्ट्राचा वातावरण बदलायचा प्रयत्न करत आहे, याचा तपास करायला हवा अशी मागणी त्यांनी केली.

MNS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group