राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, बडा नेता उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचं दिसून येत होतं.
मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसत आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
संदेश कार्ले हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत. उद्या मुंबईमध्ये ते आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.