मोठी राजकीय बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ
मोठी राजकीय बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. माझ्यासोबत 8 आमदार असून, आम्ही मोठं बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असं एका मंत्र्यानं सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

शिवसेना शिंदे गटातील एक मंत्री आणि 8 आमदार परत शिवसेना ठाकरे गटात येण्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता. माझ्यासह 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असं मंत्र्याने सांगितल्याचा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलाय. आम्ही तुम्हाला माफ करु शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलय. तसेच 2019 नंतर भाजपने 5 प्रमुख चेहरे आयात केले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. एका वृत्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

एका मंत्र्यासह 8 आमदार परत ठाकरे गटात येणार असल्याचं वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. हा मंत्री नेमका कोण? आणि त्यांच्यासोबत परत ठाकरे गटात येणारे 8 आमदार कोणते अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group