सुप्रीम कोर्टाकडून जामीन ! कुख्यात गुंड अरुण गवळी तब्ब्ल १८ वर्षांनंतर तुरुंगाबाहेर
सुप्रीम कोर्टाकडून जामीन ! कुख्यात गुंड अरुण गवळी तब्ब्ल १८ वर्षांनंतर तुरुंगाबाहेर
img
वैष्णवी सांगळे
अंडरवर्ड डॉन अरुण गवळीची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली. मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नागपूर कारागृहामध्ये अरुण गवळी शिक्षा भोगत होता. या प्रकरणात अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली.

जीआरविरोधात छगन भुजबळ आक्रमक; जात बदलता येत नाही, आम्हीही...

नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील १८ वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता. जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. अखेर आज नागपूर मध्यवर्ती कारागृहातून अरुण गवळी ची सुटका झाली. मागच्या गेटने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळीची सुटका केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे अरुण गवळीचे व्हिडीओ समोर आले आहेत.

कसाऱ्यात कारचा भीषण अपघात ! तिघांचा जागीच मृत्यू

अरुण गवळीने जन्मठेप प्रकरणी १७ वर्षे कारागृहात शिक्षा भोगली. त्याचे वय ७६ वर्षे झाले. वयाचा विचार करून कोर्टाने त्याला जामीन दिला. सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर आज त्याची तुरूंगामधून सुटका झाली. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. पांढरा शर्ट, पांढरी पँट, पांढरी टोपी आणि पांढऱ्या रंगाची चप्पल अशा लूकमध्ये अरुण गवळी दिसला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group