शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट
शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट
img
Dipali Ghadwaje
पुणे : राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन आता चर्चा सुरु झाली आहे.  पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घेतलेली भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याने खळबळ उडाली आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धक्कादायक बाब म्हणजे गुंड हेमंत दाभेकर हा जामीनावर बाहेर असून तो मृत शरद मोहोळच्या जवळचा आहे. यावर आता श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत : संजय राऊत 
याबाबत संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “मा. गृहमंत्री देवेन्द्रजी जय महाराष्ट्र!... महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात, गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण?... काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!,” असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

विशेष म्हणजे हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ यांचा अत्यंत जवळचा होता. अशात दाभेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्याने आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. 



 
इतर बातम्या
Join Whatsapp Group