अंडरवर्ल्ड डॉन, कुख्या गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याची मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. एक महिन्याच्या आत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश देण्यात आले आहेत. 2006 सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अखेर नागपूर खंडपीठाने अरूण गवळी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे.

१० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे.
याचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. विविध शारीरिक आजार जडले आहेत. निम्मा कारावासही भोगला आहे. त्यामुळे कारागृहातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती गवळीने केली होती.
गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय देताना नागपूर खंडपीठाने अरुण गवळी याच्या मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण ?
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात अरूण गवळी यावा जन्मठेपेची शिक्षा झाली. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना 2 मार्च 2007रोजी घडली होती. कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती. त्यानंतर अरूण गवळीने या सुपारीची प्रताप गोडसेला जबाबदारी दिली होती. 2 मार्च रोजी कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली.