पंतप्रधान मोदी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, सभेची तारीख ठरली ; मनसे नेत्यांनी दिली माहिती
पंतप्रधान मोदी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, सभेची तारीख ठरली ; मनसे नेत्यांनी दिली माहिती
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे घोषित केल्यानंतर राज्यभरातील मनसैनिक प्रचारात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द राज ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित केले. त्यानंतर आता राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मोठी जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे. मनसे नेत्यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे.

१५ ते १७ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात असे दिसून आले की, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यापासून मनसैनिक प्रामाणिकपणे महायुतीच्या प्रचारात उतरले आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, भिवंडी यांसह अनेक ठिकाणचा आढावा घेतला. कार्यकर्ते उत्साहात कामाला लागले आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

तसेच शिवाजी पार्क मैदानासाठी आम्ही प्रथम अर्ज केला आहे, त्यामुळे मैदानाची परवानगी आम्हालाच मिळणार, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.१७ मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार पुढे बोलताना बाळा नांदगावकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. १७ मे रोजी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेची तयारी करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली.

राज ठाकरेंची सभा आम्ही नेहमीच घेतो. त्यामुळे त्याची तयारी आम्ही नेहमीच करतो. तरीही कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागते. त्यांचे म्हणणे, काही समस्या जाणून घ्याव्या लागतात. अन्य आवश्यक गोष्टी पाहाव्या लागतात. या बैठकीत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. 

१७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतील सर्व उमेदवारांसाठी होईल, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group