दशरथ पाटील यांची नाशिक लोकसभा मतदार संघातून माघार ; विधानसभा निवडणूक लढवणार
दशरथ पाटील यांची नाशिक लोकसभा मतदार संघातून माघार ; विधानसभा निवडणूक लढवणार
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याऐवजी खास लोकांच्या आग्रहाखातर आपण लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचे नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी सांगितले.

 शरणपूर रोड येथील त्यांच्या कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीकरता आपण इच्छुक होतो. पूर्वतयारी म्हणून सलग ३५ दिवस अहोरात्र गावा-गावात फिरून विकास कामांबद्दल बोलत होतो. या प्रचारादरम्यान अनेकांनी लोकसभेच्या ऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करीत शहराचा विकासावर लक्ष केंद्रित करण्याविषयी सल्ला दिला. तो सल्ला ग्राह्य धरून लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे ते म्हणाले.

 विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के लढविणार असून अपक्ष लढविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक लढाविण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे मागणी केलेली नाही, मात्र पक्षाने विचारणा केल्यास आनंद असे. सांगून दशरथ पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीतून माघार जरी घेत असलो तरी कोणाला पाडण्यासाठी किंवा कोणाला निवडून यावे म्हणून उमेदवारी घेणार नव्हतो, तर जिंकण्यासाठीच लढणार होतो. आता हीच भूमिका विधानसभा निवडणुकीच्या वेळी असणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील अर्ज माघारी नंतर आपण शिल्लक उमेदवारापैकी कोणा उमेदवाराला निवडून द्या याबद्दल आपण सांगणार असल्याचे ते म्हणाले.
नाशिक महानगरपालिकेतील कामकाजाबद्दल बोलताना दशरथ पाटील म्हणाले की, नाशिक शहराला पुरेल इतके पाणी आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही अडचण होत आहे.

मोठ मोठी कामे पुढे करून केवळ टेंडर काढले जात आहेत. प्रत्यक्षात कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करीत ते म्हणाले, गोदावरी, वालदेवी, नाखर्डी नद्या आता गटारी झाल्या आहेत. त्याच्या स्वच्छतेबद्दल कोणीही काही बोलत नाही. नागरिक समस्यांकडे दुर्लक्ष करीत नियम डावलून कामे केलेली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

लोकांच्या समस्या आणि नागरी विकासासाठी माझा सतत पुढाकार असेल. शहरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई या महत्त्वाच्या गोष्टी असून त्याकडे अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांचे चिरंजीव प्रेम पाटील उपस्थित होते 
इतर बातम्या
Join Whatsapp Group