लोकसभा निवडणूक :  शांतिगिरी महाराज आज
लोकसभा निवडणूक : शांतिगिरी महाराज आज "हा" मोठा निर्णय घेणार
img
Dipali Ghadwaje
राज्यात सर्वत्र लोकसभा निवडूणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यात तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता राज्यात सगळ्यांचं लक्ष चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानाकडे लागलेलं आहे. नाशिक  सोडून शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा नेमका कुणाला? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज यासंदर्भात शांतिगिरी महाराज आणि भक्त परिवार निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. 

नाशिक वगळता अन्य लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा कुणाला? हे चित्र आता स्पष्ट होणार आहे. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शांतिगिरी महाराज आणि भक्त परिवार निर्णय घेणार आहेत. मोठा भक्त परिवार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये कुणाच्या पारड्यात मतं टाकायची? हे आज शांतिगिरी महाराज ठरवणार आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे. शांतिगिरी महाराज सहा लोकसभा मतदारसंघातील भूमिका आज स्पष्ट करणार आहेत. दिंडोरी, संभाजीनगर, शिर्डी, धुळे, जळगाव आणि जालना या लोकसभा मतदारसंघांमध्ये जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे.

नाशिकसह या सहा लोकसभा मतदार संघामध्ये आपले उमेदवार उभे राहणार असल्याचं शांतिगिरी महाराजांनी सांगितलं होतं. या मतदार संघामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय भूमिका घ्यायची, याबाबत आज पत्रकार परिषदेतून निर्णय होणार आहे. प्रामुख्यानं जळगाव, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरसह अन्य काही लोकसभा मतदारसंघांबाबत निर्णय होणार आहे. 

दरम्यान राज्यातील १३ ते १४ जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार आहे. शांतिगिरी महाराज कुणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group