"आधी जागा जिंका आणि मगच.....", चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
img
DB
देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका सुरु केलाय. दरम्यान राजकीय नेते ऐकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले बावनकुळे?

उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा माणूस मी आयुष्यात बघितला नसल्याचे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरेंना माझे चॅलेंज आहे, मागच्या वेळी मोदींचा फोटो लावून, मोदींचे भाषण करुन 18 जागा जिंकल्या होत्या. आता त्यांनी तेवढ्या जागा जिंकूनच दाखवाव्यात नंतरच त्यांनी मुख्यमंत्री बनण्याच्या गोष्टी कराव्यात असे बावनकुळे म्हणाले.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group