शिरुरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असेन ; अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
शिरुरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असेन ; अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
img
DB
छोट्या पडद्यावर ऐतिहासिक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण पाच वर्ष उपलब्ध असेल, असं वक्तव्य शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

यावेळी त्यांनी ५ वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका जाहीर केली. शिरुर लोकसभा मतदारसंघाची ही जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी माझ्यावर आहे. या जबाबदारीच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.  आज मी सात ते आठ लोकसभा मतदारसंघात प्रचार करतोय. त्यामुळे या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तेवढा वेळ देणं गरजेचं असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group