अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसह सर्वांचेच लक्ष निवडणुकीकडे लागलेआहे . याच दरम्यान निवडणूक आयोग देखील ऍक्शन मोड मध्ये आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या अनेक राजकीय नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी केली. नाना पटोले हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-एससीपीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
दरम्यान , गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बॅग तपासली. निवडणुकीच्या प्रचारासाठी खर्गे नाशिकला गेले होते. तथापी, कराड विमानतळावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही अशाचं पद्धतीने तपासणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी केली होती.