बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा
बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा
img
दैनिक भ्रमर
 बांगलादेशातील हिंदूं वर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून आज (दि.१८) रविवारी   मोर्चा काढला आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयसेवक संघ, बजरंगदल, दुर्गा वहिनी आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी या मार्गावर हे भगवे वादळ आले होते.

दरम्यान , देहूगाव, देहूरोड,आळंदी, हिंजवडी येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, देवस्थान, मंदिर समित्या, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तिरंगा, भगवे ध्वज तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगव्या टोप्या, फेटे आणि गळ्यात भगवे मफलर परीधान करून सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भारत मातेचा जयघोष करीत घोषणा देण्यात आल्या.”

बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाले आणि तेथील हिंदू, जैन, बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला. हिंदू, जैन, बौद्धांवर अमानुष हल्ले, अत्याचार, क्रूर हत्या सुरू आहेत. हे थांबविण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा. नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार (सीएए) बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी. पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर, बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत, याचे सर्वेक्षण तातडीने करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकर गायकर यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group