मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर अली आहे . दिग्गज फिल्म मेकर आणि प्रोड्यूसर दिल्ली बाबूचे निधन झाले आहे. 50 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दिल्ली बाबू हे तमिळमधील प्रसिद्ध फिल्म मेकर होते. त्यांच्या चित्रपटांचे हिंदीमध्येही रिमेक बनले आहेत. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, दिल्ली बाबूच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.