पालकांना स्वतः नंतर आपले मुले सुरक्षित कुठे वाटत असतील तर ते म्हणजे शिक्षक असतात. पण हल्ली शिक्षकांवर सुद्धा विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न आता पालकांना पडू लागला आहे. शिक्षकांकडून मुलांना मारहाण करण्यात आल्याचा बऱ्याच घटना सध्या उघडकीस येत आहेत. दरम्यान अशीच एक घटना समोर आलाय असून शिक्षकाने 11 वर्षीय मुलाला कानाखाली मारले. दरम्यान आता या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाण्यामध्ये एका शिक्षकाला शाळेच्या वर्गात 11 वर्षीय मुलाला कानाखाली मारल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. ही घटना भिवंडी मधील असून 13 जानेवारीची आहे. शिक्षकाचं नाव सैफ इक्बाल अंसारी आहे. विद्यार्थ्याच्या पालकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय न्याय संहिता अंतर्गत स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला, असे भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले आहे.