निवडणूक आयोगाकडून एकूण मतदारांचा आकडा जाहीर,   ''या'' जिल्ह्यात सर्वाधिक मतदार
निवडणूक आयोगाकडून एकूण मतदारांचा आकडा जाहीर, ''या'' जिल्ह्यात सर्वाधिक मतदार
img
दैनिक भ्रमर
मतदारांच्या वाढत्या संख्येत पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केला एकूण मतदारांचा आकडा, कोणत्या जिल्ह्यात किती मतदार? जाणून घ्या

येत्या  काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहे. दरम्यान  आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार नोंदणीत तब्बल 16 लाख 98 हजार 368 मतदार वाढल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच निवडणूक आयोगाने याबद्दलची आकडेवारी जाहीर केली आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये राज्यात एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 इतके मतदार होते. पण, मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात 20 लाख 78 हजार 081 नव्या मतदारांचे अर्ज आले. यात 8 लाख 80 हजार 676 पुरूष मतदार तर 11 लाख 97 हजार 240 महिला मतदारांचा समावेश होता.

पण त्यातील काही हरकतीनंतर 3 लाख 79 हजार 713 अर्ज वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता मतदार यादीत 16 लाख 98 हजार 368 नव्या मतदारांची भर पडली आहे. निवडणूक आयोगने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत महाराष्ट्रात मतदारांची संख्या 9 कोटी 53 लाख 74 हजार 302 इतकी झाली आहे. यात 4 कोटी 93 लाख 33 हजार 996 पुरूष तर 4 कोटी 60 लाख 34 हजार 362 महिला मतदार आहेत. तर 5 हजार 944 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

दरम्यान, या मतदारांच्या वाढत्या संख्येत पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात 86 लाख 47 हजार 172 मतदार आहेत. तर मुंबई उपनगरमध्ये 75 लाख 82 हजार 866 आणि ठाणे जिल्ह्यात 70 लाख 7 हजार 606 मतदार आहेत.

या मतदारांच्या वाढत्या संख्येत पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात 86 लाख 47 हजार 172 मतदार आहेत. तर मुंबई उपनगरमध्ये 75 लाख 82 हजार 866 आणि ठाणे जिल्ह्यात 70 लाख 7 हजार 606 मतदार आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group