WhatsApp वापरणाऱ्यांनो सावधान! गृह मंत्रालयाचा मोठा अलर्ट ! एक चूक पडू शकते महागात; ॲडव्हायझरी जारी
WhatsApp वापरणाऱ्यांनो सावधान! गृह मंत्रालयाचा मोठा अलर्ट ! एक चूक पडू शकते महागात; ॲडव्हायझरी जारी
img
Nandini khandare More

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! WhatsApp Web वापरताना केलेली एक छोटीशी चूक तुमच्या अकाउंटच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाशी संबंधित सायबर सुरक्षा यंत्रणेकडून युजर्सना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, WhatsApp Web वापरल्यानंतर केवळ ब्राउझरची टॅब बंद करणं पुरेसं नसून, अकाउंटमधून योग्य पद्धतीने लॉगआउट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नेमका काय आहे हा सायबर अलर्ट? तुमचं WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर...

केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सोमवारी नागरिकांना व्हॉट्सॲपवरून गोपनीय माहिती शेअर करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. काही गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींकडून माहितीचा गैरवापर केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने हा इशारा दिला आहे.

नॅशनल सायबरक्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिट (NCTAU) आणि इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये व्हॉट्सॲप वेबचे ऑथेंटिकेटेड सेशन वापरून एखाद्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲप अकाउंटमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला जाऊ शकतो.

व्हॉट्सॲप वेब वापरताना असलेल्या संभाव्य धोक्यांबाबत या ॲडव्हायझरीमध्ये सावध करण्यात आले आहे. विशेषतः शेअर केलेल्या किंवा इतर व्यक्तींनाही वापरता येणाऱ्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेबचे सेशन लॉग इन ठेवणे धोकादायक ठरू शकते. अशा सेशनचा गैरवापर करून वैयक्तिक अकाउंटमध्ये प्रवेश मिळवला जाऊ शकतो आणि वापरकर्त्याच्या ओळखीचाही गैरवापर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप वेबचे सक्रिय सेशन वापरून खासगी संभाषणे वाचू शकतात. संबंधित अकाउंटधारक असल्याचे भासवून इतरांना मेसेज पाठवू शकतात. तसेच कॉन्टॅक्ट लिस्ट आणि ग्रुप चॅट्समधील माहिती मिळवू शकतात. या माहितीचा वापर फसवणूक, फिशिंग आणि सोशल इंजिनिअरिंगसारख्या सायबर गुन्ह्यांसाठी केला जाऊ शकतो.

ऑफिस आणि सार्वजनिक कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरणे टाळा

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जारी केलेल्या या ॲडव्हायझरीमध्ये ऑफिसमधील कॉम्प्युटर, सार्वजनिक कॉम्प्युटर, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर आणि तृतीय व्यक्तींना वापरता येऊ शकणाऱ्या इतर डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group