WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र आज सकाळपासून WhatsApp Web युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर युजर्सनी याबद्दल तक्रार केली आहे. WhatsApp Web वरून मेसेज पाठवण्यात अडचणी येत असल्याचं सांगितलं आहे.
तसेच काही लोकांना आणखी एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे ती समस्या म्हणजे WhatsApp Web वर स्क्रोलिंगला प्रॉब्लेम येत आहे. आज सकाळपासून व्हॉट्सअॅप वेबवर स्क्रोलिंगसाठी अडथळे निर्माण होत आहेत. ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे यामुळे काम रखडत आहेत. या संदर्भात सोशल मिडीयावर तक्रारींची रांग लागली आहे.
सध्या व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी नवे फीचर सुरु केले आहे. मात्र वेबवर स्क्रोलिंगला येत असलेल्या अडथळ्यानंतर वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका तक्रारकर्त्याने म्हटले आहे, " आज व्हॉट्सअॅप वेब मध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आमच्या ऑफिस मधील बरीच काम धीम्या गतीने सुरु आहेत. तर दुसऱ्याने म्हटले आहे, "माझ्या व्हॉट्सअॅप वेब मध्ये स्क्रोलिंग करताना अडचणी येत आहेत"
या समस्येबद्दल व्हॉट्सअॅपकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. तसेच आज सकाळ पासून या अडचणीमुळे व्हॉट्सअॅप वेबवर काम करणाऱ्या वापरकर्त्यांचे हाल होताना पाहायला मिळतायत. शिवाय या अडचणी सकाळच्या वेळेस उदभवल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. दरम्यान स्क्रोलिंग का बंद पडलं या प्रश्नाचं उत्तर वापरकर्ते शोधत आहेत.