WhatsApp च भन्नाट फिचर ! आता दुसऱ्या अ‍ॅपवरही पाठवू शकाल मॅसेज
WhatsApp च भन्नाट फिचर ! आता दुसऱ्या अ‍ॅपवरही पाठवू शकाल मॅसेज
img
दैनिक भ्रमर

मुंबई : WhatAspp नेहमीच आपल्या युइजर्स साठी नवनवीन फीचर्सर आणि अपडेट घेऊन येत असत . आपल्या यूजर्स ला कशा प्रकारे अधिक सुविधा देता येतील याचा विचार करून WhatsApp ने एक भन्नाट फिचर आणले आहे .ह्या फीचर्स चा जास्तीत जास्त फायदा यूजर्सर ला होऊ शकतो.  व्हाट्स अँप च्या या नव्या फिचर मुळे आता  इतर अँप वापरणं हि आता सोपे होणार आहे. चला तर पाहूया या विषयी सविस्तर माहिती.    हे फीचर WhatsApp यूझर्सला थर्ड पार्टी अ‍ॅप्स जसं की, टेलीग्राम, सिग्नल, iMessage आणि गूगल मेसेजवर मेसेजिंग आणि कॉलची सुविधा देतील. मेटाने WhatsApp मध्ये ही सर्विस इंटीग्रेट करण्याचा प्लॅन शेअर केलाय.

महत्वाचं म्हणजे  यामध्ये यूझर ठरवू शकतील की, त्यांना कोणत्या थर्ड पार्टी अ‍ॅपवरुन मेसेज रिसीव्ह करायचा आहे. मेटानुसार यूझर्स सर्व मेसेज एकाच इनबॉक्समध्ये पाहू शकतील.

कंपनीने  म्हटलं की, ते यूझर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी मेनटेन ठेवणाऱ्या टेक्नॉलॉजीवर काम करत होते. सोबतच मेटाने फोटो शेअर करत हेही दाखवलं की, WhatsApp आणि मेसेंजरवर थर्ड पार्टी चॅट्स कशा दिसतील.मेटाने म्हटलंय की, थर्ड पार्टी चॅट्सविषयी यूझर्सला नोटिफाय करण्यासाठी WhatsApp आणि मेंसेजरमध्ये नवीन नोटिफिकेशन तयार करण्यात आलेय. हे यूझर्सला नवीन मेसेजिंग अ‍ॅपने येणाऱ्या मेसेजविषयी नोटिफाय करतील.

यूझर्सची इच्छा असल्यास ते थर्ड पार्टी चॅट्ससाठी वेगळं फोल्डरही क्रिएट करु शकतात. थर्ड पार्टी अ‍ॅप्सने चॅटिंगसाठी यूझर्सला टायपिंग इंडिकेटर, रीड रिसीट, डायरेक्ट रिप्लाय आणि रिअ‍ॅक्शन सारखे ‘Rich messaging feature’ ही मिळतील. तसेच ,थर्ड पार्टी कॉलिंग फीचरविषयी बोलायचं झाल्यास, कंपनीने म्हटलं की, ते 2027 मध्ये उपलब्ध करुन दिलं जाईल. मेटाने यूरोपियन यूनियनच्या डिजिटल मार्केट अ‍ॅक्ट अंतर्गत व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजरमध्ये मोठा बदल करण्याता निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ग्रुप चॅटमध्ये कॉल लिंकचं फीचर ऑफर करेल. रिपोर्टनुसार या फीचरच्या मदतीने यूझर्स ग्रुप चॅटमध्येच कॉल लिंक क्रिएट करु शकतील. या फीचरची विशेषता म्हणजे, यामधून केले जाणारे कॉल्स यूझर्सला रिंग न करता सुरु होतील. हे फीचर गूगल मीटप्रमाणेच आहे. ज्यात यूझर्स इतर मेंबर्ससोबत एका लिंकच्या माध्यमातून कनेक्ट होतात. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group