व्हॉट्सअ‍ॅपची ‘ही’ एक सेटिंग बंद करा , नाहीतर मोठा फटका बसेल;  व्यावसायिकाला ४ लाखांचा फटका
व्हॉट्सअ‍ॅपची ‘ही’ एक सेटिंग बंद करा , नाहीतर मोठा फटका बसेल; व्यावसायिकाला ४ लाखांचा फटका
img
वैष्णवी सांगळे
सोशल प्लॅटफॉर्म्स मुळे आयुष्य जितके सोपे वाटते किंवा होते ते आता राहिले नाही. यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. व्हॉट्सअ‍ॅपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग एका व्यावसायिकासाठी घटक ठरली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या आणि सावध व्हा. 


व्यावसायिक नीलेश हेमराज सराफ (वर्षे ४९) यांच्या व्हाॅटस्ॲपवर एका फोन नंबरवरून कस्टमर्स सर्व्हिस सपोर्ट ही एपीके फाइल आली. त्यावेळी त्यांच्या व्हॉटस्ॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर होती. त्यामुळे ही फाइल ॲटोमॅटिक डाऊनलोड झाली. आणि खात्यातून ४ लाख ६४, ४३९ रुपये गायब झाले.

फाइल डाऊनलोड होताच फोनचा त्वरित ॲक्सेस मिळतो. सराफ यांच्या फोनमध्ये एपीके फाइल डाऊनलोड होताच अज्ञातने त्यांच्या फोनचा ॲक्सेस मिळवला. त्यामुळे त्याला सर्व खासगी माहिती घेणे सहज शक्य झाले. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे लक्षात येताच सराफ हे बँकेत गेले व खाते होल्ड केले. त्यामुळे उर्वरित रक्कम स्थगित झाली.

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल वायफायवर असताना ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठेवल्याने हा प्रकार घडला असून, सर्वच मोबाइल ग्राहकांनी आपल्या मोबइलचे सेटिंग तपासणे गरजेचे झाले आहे. दरम्यान सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळा जेणेकरून केव्हा कोणती फाइल येईल व ती डाऊनलोड झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते असे ते म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group