दिवाळीनंतर लाडक्या बहिणींना कधी मिळणार ₹१५००? ऑक्टोबरच्या हप्त्याची तारीख आली समोर?
दिवाळीनंतर लाडक्या बहिणींना कधी मिळणार ₹१५००? ऑक्टोबरच्या हप्त्याची तारीख आली समोर?
img
Nandini khandare More

दिवाळीचा सण उत्साहात पार पडल्यानंतर आता राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे १,५०० रुपये खात्यात कधी जमा होणार, याची लाभार्थी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. लक्ष्मीपूजनानंतर आता सरकारी आर्थिक मदतीच्या रूपात लक्ष्मी कधी येणार, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. 

लक्ष्मीपूजनाचा सण उलटून गेला असून आता राज्यातल्या लाडक्या बहि‍णींचे लक्ष ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा झाले आहेत. पण ऑक्टोबर महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार, असा प्रश्न महिलांकडून विचारला जातोय

ऑक्टोबरच्या हप्त्याची संभाव्य तारीख ऑक्टोबर महिन्याचा हप्ता २५ नोव्हेंबरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा १० नोव्हेंबरपर्यंत सरकारकडून हप्त्याच्या निधीबाबत निर्णय झाल्यावर पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. मात्र २५ नोव्हेंबर ही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे महिलांनी सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नोव्हेंबरमध्ये पैसे नाही आले तर डिसेंबरमध्ये मिळणार ₹३,०००? समजा, नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला नाही, तर डिसेंबरमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹३,००० जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतही सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group