आज सर्वोत्र गणेशोत्सवाचा जल्लोष असून संपूर्ण महाराष्ट्र बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे . महाराष्ट्रातील गणेशभत्तांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो, अशी अनेकांमी गणपतीला प्रार्थना केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड अविरत राहो, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना! चला, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया…श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा”.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मनामनात एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया असे ट्वीट करत त्यांनी या पवित्र उत्सवासाठी आपले विचार व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी त्यांच्या संदेशात गणेश आगमनाचा सोहळा हा केवळ एक उत्सव नसून, तो भक्तीचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये, “आगमनाचा सोहळा, भक्तीचा उत्सव आणि मनामनात एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया” असे शब्द वापरून त्यांनी महाराष्ट्राच्या या आवडत्या सणाचे महत्त्व अधोरेखित केले.
गणेश चतुर्थीच्या आगमनापूर्वीच त्यांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे भाविकांमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. लाखो भक्तांच्या मनात घर करून राहिलेल्या गणरायाच्या आगमनाची तयारी राज्यात सर्वत्र सुरू असताना, देवेंद्र फडणवीस यांच्या या संदेशामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्त्वाचे नेते असलेले फडणवीस यांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवासाठी दिलेल्या या शुभेच्छा नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वीकारल्या जात आहेत.
/div>