१३ जानेवारी २०२५
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढळवून निघालेले असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना थेट राज्यचं बंद करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ते मस्साजोगमध्ये बोलत होते.
यावेळी जरांगेंनी कराडची टोळी कशी उभी राहिली असा प्रश्न उपस्थित करत या घटनेत एकही आरोपी सुटला तर, एका मिनिटात राज्य बंद करून टाकेन असा इशारा दिला आहे.
यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनावणे हे देखील उपस्थित होते. वाल्मिक कराड खंडणीतला आरोपी आहे. तो मोदींपेक्षा मोठा लागला की काय. त्याला 302 मध्ये आरोपी करू शकत नाही, अशी टीकाही केली.
मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडायला लागले आहे, जोपर्यंत तुमचे पाऊल चुकीच पडत नव्हते तेव्हा समाज शांत होता. मुख्यमंत्री तुम्हाला भेटून देशमुख कुटुंबीय हाताश होत असेल तर तुम्ही आजच अपयशी झाला आहात.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला. यामुळे महाराष्ट्र शांत आहे. परंतु तपास यंत्रणेचे हात बांधलेले आहे की काय अशी शंका येत आहे. आता सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. ती आजच देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
Copyright ©2025 Bhramar