CM देवेंद्र फडणवीसांच्या  ''या'' निर्णयाने एकनाथ शिंदेंचे आमदार नाराज
CM देवेंद्र फडणवीसांच्या ''या'' निर्णयाने एकनाथ शिंदेंचे आमदार नाराज
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांमध्ये अनेकदा नाराजीचे सूर पाहायला मिळाले. दरम्यान,  आधी मुख्यमंत्री पदावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या तर त्यांनतर पालकमंत्री पदावरून नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद फडणवीस सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारही नाराज झाले आहे. त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन आपल्या आमदारांना दिले आहे.

काय घेतला निर्णय
महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. यापूर्वी वाय प्लस असलेली मंत्र्यांची सुरक्षा ही वाय दर्ज्याची करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाय श्रेणी ही सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. यामध्ये 11 जणांचे पथक सुरक्षा देत असते. त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही असतो. मंत्र्यांची सुरक्षा कपात करताना आमदारांची सुरक्षाच काढून घेतल्याची माहिती आहे.

17 फेब्रुवारीपासून शिवसेना आमदार, मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली. यामुळे मंत्री, आमदार नाराज झाल्याची माहिती मिळाली. शिवसेना आमदारांनी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली आपबिती मांडली आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदारांना सांगितले.

ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा व्यक्तीची सुरक्षा कमी केली आहे. त्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी आहे. त्यात प्रतापराव चिखलीकर, सुरेश खडे यांच्यासह अनेक जणांची सुरक्षा कपात केली आहे. आमदारांसोबत एकच सुरक्षा रक्षक असणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group