
४ जुलै २०२५
पुणे : राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प, नोकऱ्या गुजरातल्या पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे, त्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठी अस्मितेवरून वातावरण तापलं असतााना एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहा यांच्यासमोरच जय गुजरातची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं ?
केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. यावेळी भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र म्हटले आणि निघत होते. तेव्हा खाली वाचून त्यांनी पुन्हा जय गुजरात असा नारा दिला. यावरून आता वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
Copyright ©2025 Bhramar