माणुसकीला काळिमा !  युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण
माणुसकीला काळिमा ! युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण
img
दैनिक भ्रमर
माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना बिहार मध्ये घडली आहे . चोरीच्या आरोपातून  एका युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर  टाकल्याची धक्कादायक कृत्य  स्थानिकांकडून करण्यात आले आहे . 

युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या युवकावर बाईक चोरीचा आरोप असल्याची  प्राथमिक माहिती आहे  चोरीच्या आरोपातून युवकास पकडल्यानंतर स्थानिकांनी ही शिक्षा दिली. मात्र, त्यांचं हे कृत्य माणूसकीला काळिमा फासणारं असल्याने नेटीझन्कडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

तसेच, पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटीझन्सने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींवर मोठी कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे.

सोमवार 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची  खात्री केल्यानंतर याबाबत माहिती दिली. बिहारच्या अररिया येथील ही घटना असून चोरीच्या आरोपात पकडलेल्या युवकासोबत हे कृत्य घडलं आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, इतरांच्याबाबतीत पोलिसांकडूनतपास सुरू असून कारवाई केली जात आहे, असेही बिहार पोलिसांनी  माहिती देताना म्हटलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group