रात्रीस बैठक चाले! वर्षा बंगल्यावर रात्री एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच भेटले ; नेमकी काय झाली चर्चा? वाचा
रात्रीस बैठक चाले! वर्षा बंगल्यावर रात्री एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच भेटले ; नेमकी काय झाली चर्चा? वाचा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांच्या नजरा महायुती सरकारचे मंत्रिमंडळ आणि त्यामधील खातेवाटपाकडे लागल्या आहे.

महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासही फारसे उत्सुक नव्हते, अशी चर्चा होती. हा शपथविधी पार पडल्यानंतरही महायुती सरकारच्या खातेवाटपाबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेच रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेटले. या दोघांमधील बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या बैठकीत गृहमंत्रीपद आणि इतर खात्यांबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. परंतु, अद्यापपर्यंत या बैठकीचा तपशील समोर आलेला नाही.

वर्षा बंगल्यावरील या बैठकीत तासभर सुरु असलेल्या खलबतांमध्ये मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याचे समजते. आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज महायुती सरकारकडून सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यानंतर राज्य सरकार खऱ्या अर्थाने अस्तित्ताव येईल.

 आगामी 10 दिवस हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. याच काळात राज्याचे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळणार की नाही, याचा फैसला होईल. तसेच शिंदे गटाच्या वाट्याला नेमकी कोणती खाती येणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group