एकनाथ खडसेचे जावई प्रांजल खवलकर यांना पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कोर्टाने खेवलकर यांच्यासह सात जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती कोर्टात दिली होती.
खराडीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणी कऱण्यात आली होती. त्यामध्ये दोन जणांनी दारूचे सेवन केल्याचं समोर आले.
एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर यांनीही त्या रात्री दारू प्यायली होती हे ससून रूग्णालायतील अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून अधिक गुन्हेगारी माहिती बाहेर येण्याची शक्यता.
खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाचा अहवाल ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली. ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी अल्कोहोलचे सेवन केले असल्याचा अहवाल मिळाला आहे. खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी दारू प्यायलं हे स्पष्ट झालं आहे.