काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात
img
Dipali Ghadwaje

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. ५५ वर्षे देवरा कुटुंबीय काँग्रेसशी संबंधित होते. आज सकाळी देवरा यांनी ट्विट करत आपल्या सदस्यत्व पदाचा  राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार असून ही जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आता शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्यासोबत काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनाही शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून ते 2004 आणि 2014 साली निवडून आले आहेत. 2019 साली त्यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. त्याचमुळे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या मिलिंद देवरा यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या देवरा हे दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्याची शक्यता आहे.

पतंग उडवताना विजेच्या धक्क्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू


इतर बातम्या
Join Whatsapp Group