पतंग उडवताना विजेच्या धक्क्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
पतंग उडवताना विजेच्या धक्क्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
img
DB
पतंग उडवत असताना विजेचा धक्का लागून पाथर्डी फाटा येथे पंधरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भावेश विजय वाघ हा तरुण आज पाथर्डी म्हाडा कॉलनी साई राम रो हाऊस येथे पतंग उडवत होता. दुपारच्या सुमारास पतंग उडवत असताना त्याला विजेचा धक्का लागला. घटना घडल्यानंतर परिसरातील लोकांना ही बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विजेचा तीव्र झटका बसल्याने डॉक्टरांनी तपासून करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
इतर बातम्या
गंगापूर धरण

Join Whatsapp Group