मोठी बातमी ! जंतर-मंतरला आंदोलन स्थळाच्या यादीतून वगळलं; आता कोणते पर्याय ?
मोठी बातमी ! जंतर-मंतरला आंदोलन स्थळाच्या यादीतून वगळलं; आता कोणते पर्याय ?
img
Nandini khandare More

नवी दिल्लीतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध आंदोलनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जंतर-मंतरची 'अधिकृत आंदोलन स्थळ' म्हणून असणारी मान्यता दिल्लीपोलिसांकडून रद्द  करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून, जंतर-मंतरवर आता कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांना किंवा निदर्शनांना परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे राजधानी दिल्लीतील आंदोलनांच्या संस्कृतीत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहे.

आता धरणं-आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी आता तीन नवीन जागा निवडल्या आहेत. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD ग्राउंड या तीन ठिकाणी आता आंदोलन करता येईल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी काढलेल्या स्टँडिंग ऑर्डरनुसार जंतर-मंतर आंदोलन स्थळाला अधिसूचित व्यवस्थेतून हटवण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने समिती स्थापित केलेली. त्यांनी दिलेल्या शिफारशींच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना आंदोलन करता यावं तसचं आंदोलनाचा अधिकार अबाधित रहावा यासाठी समितीवर विद्यमान स्थळांचा पर्याय शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली. आता समितीने केलेल्या शिफारशींनुसार तीन पर्यायी स्थानं निश्चित करण्यात आली आहेत. मागच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आंदोलनासाठी जागा निश्चित करण्यास सांगितलेलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group