मोठी बातमी ! महायुतीची आजची बैठक अचानक रद्द ;
मोठी बातमी ! महायुतीची आजची बैठक अचानक रद्द ; "हे" कारण आले समोर
img
DB
 सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह  यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार होती.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचे मूळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group