बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा शपथ विधी सोहळा आता एकही वेळातच नागपुरात पार पडणार आहे.दरम्यान त्या आधी आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत महायुतीमधील 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आला आहे, ज्यामध्ये भाजपचे 20, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 10 आमदारांचा समावेश आहे.
दरम्यान, खातेवाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिदे गट गृह मंत्रिपदासाठी आग्रही होता, मात्र हे खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे.गृहमंत्रालयासोबतच भाजपकडे महसूल, शिक्षण आणि पाठबंधारे ही खाती राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाला नगर विकास मंत्रालयासोबत गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, आयटी आणि मराठी भाषा ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अर्थ मंत्रालयासोबत, क्रीडा आणि सहकार खातं मिळण्याची शक्यता आहे.