मोठी बातमी! काँग्रेसच्या
मोठी बातमी! काँग्रेसच्या "त्या" बंडखोर उमेदवाराचे निलंबन
img
Dipali Ghadwaje
काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधीचे पत्रक काढत निलंबनाचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाहू महाराज हे काँग्रेसच्या हाताचा पंजा चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचे समोर आले होते.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सामान्य कार्यकर्त्यांनी किती दिवस काम करत राहायचे. पक्षातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलो असल्याचे बाजीराव खाडे यांनी म्हटले होते. आता या बंडखोरीची पश्रश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून खाडे यांचे ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group