शरद पवारांचा ८४वा वाढदिवस, अजित पवारांनी ट्विट करत  काकांना दिल्या खास शुभेच्छा,  वाचा
शरद पवारांचा ८४वा वाढदिवस, अजित पवारांनी ट्विट करत काकांना दिल्या खास शुभेच्छा, वाचा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आज (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस  आहे. शरद पवार यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवारांनी 85 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाच्या 'एक्स' हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे.

या ट्विटमधून शरद पवारांच्या जीवनातील खास प्रसंग दाखवण्यात आले आहे. तर त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. 

पुतण्याकडून-काकांना खास शुभेच्छा

आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त 'एक्स'वर शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे त्यांनी म्हटले आहे. तर आज अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही दिल्ली मध्ये आहेत. शरद पवारांच्या वाढदिवशी काका-पुतण्याची भेट होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

दरम्यान, आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार पक्षाच्या एक्स  हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे. आज दिवसभर  शरद पवारांच्या आयुष्यातील माहिती नसलेले क्षण ट्विट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group