विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजपने त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यामध्ये भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यातच आज भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीत आज दिवसभर महायुतीच्या मॅरेथॉन बैठका होणार असल्याची माहिती मिळत असून बैठकीत भाजपच्या 18 ते 20 जागांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीनंतर संध्याकाळी भाजपची यादी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत.