ठाकरे गटाचे 53 शिलेदार ठरले, कुणाला तिकीट तर कुणाचा पत्ता कट? वाचा
ठाकरे गटाचे 53 शिलेदार ठरले, कुणाला तिकीट तर कुणाचा पत्ता कट? वाचा
img
Dipali Ghadwaje
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काथ्याकुट सूरू आहे.  महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात ताणाताणीमुळे जागा वाटपाचं त्रांगडं सुटेल की नाही हे थोड्याच वेळात समोर येईल. मविआत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर या धामधुमीत ठाकरे गटाने आतापर्यंत 53 उमेदवारांची नावं अंतिम केल्याची माहिती समोर येत आहे.

गुरूवारपासून विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीवर येऊन भेटी घेतल्या. त्यानंतर तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून आतापर्यंत 53 उमेदवारांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे समोर येत आहे.

ठाकरे गट महाविकास आघाडीत 96 ते 98 जागा लढणार असल्याची माहिती आहे. त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात आले आहे. या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.

 त्यानंतर निवडणुकीसंबंधी या उमेदवारांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने एकूण आतापर्यंत 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. आता या जागा वाटपात कुणाचा पत्ता कट, कुणाला देव पावणार हे लवकरच समोर येईल.

दरम्यान मविआत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आज थोरात आणि शरद पवार हे उद्धव ठाकरे यांची दुपारी भेट घेणार आहेत. त्यात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group