मोठी बातमी! राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल
img
Nandini khandare More

देशात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्लीत आंदोलन करणं चांगलंच भोवलं आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत इंडिया आघाडीने आंदोलन केलं होतं. यावेळी आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

६ ऑक्टोबर रोजी 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या निवडणूक आयोग मार्चदरम्यान आकाशवाणी भवन परिसरात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.मंगळवारी निवडणूक आयोगावर राहुल गांधींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी वाटेतच रोखले होते. यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही प्रमुख नेते अचानक आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले आणि तिथेच धरण्यावर बसले. तब्बल ९ तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group