प्रियांका गांधींच्या घरी लगीनघाई !  प्रियांका गांधींची होणारी सून अविवा बेग नेमकी आहे तरी कोण ?
प्रियांका गांधींच्या घरी लगीनघाई ! प्रियांका गांधींची होणारी सून अविवा बेग नेमकी आहे तरी कोण ?
img
वैष्णवी सांगळे
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा सुपूत्र रेहान वाड्राचा साखरपुडा पार पडला आहे. एका खासगी कार्यक्रमात हा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान वाड्राने त्याची सात वर्षे जुन्या मैत्रिणीला प्रपोज केलं आणि अविवा बेगने अत्यंत आनंदात त्याच्या प्रपोजलाचा स्वीकार केला. दोन्ही कुटुंबाच्या परवानगीनंतर हा साखरपुडा पार पडला. 

रेहानच्या होणाऱ्या पत्नीचे नाव अविवा बेग असल्याचे कळाल्यापासून ती चांगलीच प्रसिद्धीत आली. अविवा बेग ही नेमकी कोण आहे, काय करते याबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. यापूर्वी रेहान आणि अविवा बेग यांच्या नात्याबद्दल फार काही लोकांना माहिती नव्हते. पण दोघे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

अविवा बेग नेमकी आहे तरी कोण ? 
अविवा ही व्यवसायाने एक छायाचित्रकार आणि निर्माती आहे. तिचे शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले असून आपल्या आई वडिलांसोबत ती दिल्लीत राहते. अविवा हिने मॉडर्न स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले नंतर ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया कम्युनिकेशन आणि पत्रकारितेमध्ये पदवी घेतली. फक्त हेच नाही तर अविवा बेग ही एक माजी राष्ट्रीयस्तराची फुटबॉल खेळाडू आहे. तिने अनेक फुटबॉल सामान्यात धमाल केली. फोटोच्या निमित्ताने अविवा ही संपूर्ण देशभरात फिरते. रेहान आणि अविवा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. सुरूवातीच्या काळात दोघे फक्त मित्र होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रेहान राजकारणापासून दूर
मोठा राजकीय वारसा लाभलेला रेहान राजकारणापासून तसा अजून दूर आहे. २९ ऑगस्ट २००० रोजी जन्मलेला २५ वर्षीय रेहान प्रसिद्धीपासून दूर असतो. रेहान अनेकदा प्रियंका गांधींसोबत दिसतो. मात्र राजकारणापासून तो दूर राहिला आहे. रेहानने डॉर्क परसेप्शन नावाचं सोलो एक्झिबिशन केलं आहे. कोलकातात त्याच्या फोटोग्राफीचं प्रदर्शनही लागलं होतं. रेहान व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. रेहान यानेही आपले शिक्षण दिल्ली आणि डेहराडूनमध्ये पूर्ण केले. त्यानंतर लंडनच्या SOAS विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group