मोठी बातमी : प्रियंका गांधी यांची प्रकृती बिघडली ; रुग्णालयात दाखल
मोठी बातमी : प्रियंका गांधी यांची प्रकृती बिघडली ; रुग्णालयात दाखल
img
DB
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज त्या उत्तर प्रदेशातील चंदौली येथील भारत जोडो न्याय यात्रेला राहणार होत्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. 

याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हणाल्या आहेत की, माझी तब्येत बरी झाल्यावर मी भारत भारत जोडो न्याय यात्रे सहभागी होणार. 

प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, "भारत जोडो न्याय यात्रेची उत्तर प्रदेशात पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. पण आजारपणामुळे मला आजच रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मला बरे वाटल्यावर मी या यात्रेत सामील होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना आणि उत्तर प्रदेशातील प्रिय बंधू जे यात्रेत सहभागी होण्याची तयारी करत आहेत. त्यांना मी शुभेच्छा देते.''  

इतर बातम्या
Join Whatsapp Group