अमित शहा यांना काल सभागृहात चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अमित शहांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहे. दिल्लीसह राज्यातही याचे पडसाद पाहायला मिळत आहे. दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केले आहे तर राज्यात विरोधी पक्षांनी विधानपरिषदेबाहेर आंदोलन केले आहे.
दरम्यान, भाजपच्या खासदारांनी मला धक्काबुक्की केले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधीसह प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांची संसदेबाहेर अमित शहा यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. यावेळी राहुल गांधीना संसदेत जाण्यापासून भाजपच्या खासदारांनी अडवले असल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी ?
भाजपचे जे खासदार आहेत ते संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ मला अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते मला अडवत होते, ढकलत होते आणि धमकावत देखील होते.पण ठिके, धक्काबुक्कीमुळे आम्हाला काही होत नाही.हा संसदेचा प्रवेशद्वार आहे. संसदेत जाणे हा आमचा अधिकार आहे तरीही भाजपचे खासदार आम्हाला आतमध्ये जाण्यापासून अडवत होते. संसदेत संविधानावर आक्रमण करत आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.