काँग्रेसच्या माजी आमदारानं घेतली एकनाथ शिंदेंची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
काँग्रेसच्या माजी आमदारानं घेतली एकनाथ शिंदेंची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
img
Dipali Ghadwaje
पुणे : मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे गटाला बसला आहे. ठाकरे गटातून शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्यांची रिघ लागली आहे. त्यातच पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धंगेकरांनी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.  या भेटीनंतर रवींद्र धंगेकर सेनेत प्रवेश करतील अशी चर्चा माध्यमातून सुरू झाली.

दरम्यान रवींद्र धंगेकर म्हणाले की, माझ्या वैयक्तिक कामासाठी मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. मी सरकारी बंगल्यात भेटलो, लपून भेट घेतली नाही. माझं काम होते, ते करायला गेलो होतो. कामासाठी गेलो आणि भेटून आलो. त्यांच्याकडे गर्दी होती, त्यातून मला २ मिनिटांचा वेळ दिला, मी भेटलो आणि माझ्या कामाची चर्चा केली. काही माध्यमांनी आजच मी प्रवेश करणार अशी बातमी लावली.

काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्याला जनाधार आहे. शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे भेटलो. लोकांच्या कामासाठी भेटावेच लागते असं त्यांनी सांगितले. 

तसेच राजकारणात एकमेकांना भेटू शकत नाही का, कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होत असतात. माझं काम निघलं तर मुख्यमंत्र्‍यांकडे जावे लागेल. पण सध्या त्यांच्याकडे काही काम नाही. याआधीही मी शिंदेंना भेटलो आहे. माझ्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली नाही.

मी काँग्रेसमध्ये आहे. वरिष्ठ जे निर्णय घेतात ते पाळावे लागतात. मी पक्षात आहे त्यामुळे काम करत आहे. मी कोणाचा प्रचार करायचा हा विषय नाही. मी माझ्या कामावर ठाम आहे. माझ्याकडे लढायची ताकद नेहमी असते. माझ्या काही अडचणी होत्या त्यासाठी मला मदत मागावीच लागणार असंही सूचक विधान रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.
 



इतर बातम्या
Join Whatsapp Group