महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराचा भीषण कार अपघात, थोडक्यात बचावले
महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराचा भीषण कार अपघात, थोडक्यात बचावले
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळारून एक मोठी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोले यांचा अपघात झाला आहे. या अपघातात खासदारांसह त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. खासदार डॉ. प्रशांत पडोले आपल्या कारने नागपूर एअरपोर्टच्या दिशेने चालले असताना हा अपघात झाला. सध्या डॉ. प्रशांत पडोले आणि त्यांच्या ड्रायव्हरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 



दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु आहे. त्यात सहभागी होण्यासाठी डॉ. प्रशांत पडोले चालले होते. डॉ. प्रशांत पडोले सोमवार सकाळी आपल्या कारने नागपूर एअरपोर्टच्या दिशेने निघाले होते.एअरपोर्ट मार्गावर असताना एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या अपघाताची माहिती दिली. 

डॉ. प्रशांत पडोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केलं. “खासदार सुरक्षित नाही, तिथे जनतेचं काय होणार?. आज दिल्लीला जायचं होतं. सकाळी भंडाऱ्यावरुन खासगी कार घेऊन नागपूर एअरपोर्टच्या दिशेने निघालो होतो. नागपूर जवळ असताना ट्रकने जोरदार धडक दिली. मला कुठे लागलं नाही. पण कारचं नुकसान झालं” 

किरकोळ दुखापत झाल्यानंतर खासदार प्रशांत पाडोले एका दुचाकीची लिफ्ट घेऊन नागपूरला पोहोचले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नागपूर विमान तळावर पोहोचले आणि दिल्लीला रवाना झाले. याआधी 2025 साली सुद्धा प्रशांत पडोले रस्ते अपघातात जखमी झाले होते. त्यावेळी सुद्धा सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group