१२ ऑक्टोबर २०२४
मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे भायखळा तालुकाअध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या झाली होती. सचिन यांच्या हत्येला आठवडा होत नाही, त्यातच माजी आमदार बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात तीन ते चार जणांनी सिद्धिकी यांच्यावर शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार केला. मुलाच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या बाबा सिद्धिकी यांच्या छातीला गोळ्या लागल्या.गोळीबारात जखमी झाल्यावर तातडीने सिद्धिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपाचारादरम्यान बाबा सिद्धिकी यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने वांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या दोन्ही आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
मुंबईत आठवड्याभरात दोन लोक प्रतिनिधींची हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Copyright ©2025 Bhramar